महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुकाराम गाथेचे लेखनिक श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक - shobhayatra

अकोल्यात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त रविवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजराजेश्वर मंदिरापासून निघालेल्या या शोभायात्रेत महाराष्ट्रातील संतांचे विचार साहित्य यासह विविध विषयांवर जनजागृती देखावे तयार करण्यात आले होते.

akola
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक

By

Published : Dec 8, 2019, 9:23 PM IST

अकोला - येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा ३९५ वा जयंती सोहळा उत्साहात पार पडला. संत तुकाराम महाराजांनी विशद केलेली तुकारामगाथा ज्यांनी लेखणीबद्ध केली ते मुळ तुकाराम गाथेचे लेखनिक व तुकाराम महाराजांचे प्रमुख टाळकरी श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा संताजी सेनेच्या वतीने काढण्यात आली होती. दरवर्षी या शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असून विविध देखावेही सादर केले जातात.

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक


अकोल्यात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त रविवारी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राजराजेश्वर मंदिरापासून निघालेल्या या शोभायात्रेत महाराष्ट्रातील संतांचे विचार साहित्य यासह विविध विषयांवर जनजागृती देखावे तयार करण्यात आले होते. संताजी महाराजांचे कार्य जगासमोर यावे आणि त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने ही शोभयात्रा काढण्यात आली. यावेळी मुलींनी जिजाऊ, सावित्री, राणी लक्ष्मीबाई अशा विविध वेशभूषा साकारल्या होत्या. स्वराज्य भवन येथे या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. या शोभायात्रेत तेली समाजाचे नागरिक, महिला, तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details