अकोला - पहिल्या चोरीचा तपास लागत नाही तोच दुसऱ्या चोरीत चोरट्यांनी साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या दुसऱ्या चोरीत गिरी नगरातील सद्गुरू इंडियन गॅस एजन्सीच्या कार्यालयातील सव्वाचार लाख रुपयांची रोख लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे, चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून हे चोरटे एका कारमध्ये चोरी करण्यासाठी आले होते. विशेष म्हणज याच काळात खदान पोलीस ठाण्याचे अमरावती विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून तपासणी करण्यात येत आहे. त्यातच चोरट्यांनी केलेल्या या चोरीमुळे पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची तिसरी घटना घडली आहे. या तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी ४ लाखांच्या वरतीच मुद्देमाल लंपास केला आहे. पहिल्या चोरीचा तपास खदान पोलिसांनी लावल्यानंतर दुसऱ्या घटनेला चोरट्यांनी साध्य करीत एका घरातून साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेच्या तपासला सुरुवात होत नाही तोच चोरट्यांनी तिसरी चोरी घडवून आणत सद्गुरू इंडेन गॅसच्या एजन्सीच्या कार्यालयात असलेल्या गल्ल्यातील रोख सव्वाचार चोरून नेले.