अकोला - कोरोना योद्धा म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच पोलिसही समोर येत आहेत. अकोट शहरात सध्यातरी एकही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. मात्र, खबरदारी म्हणून पोलीस दिवसरात्र संचारबंदीत आपले कर्तव्य बजावत आहेत. अशात पोलीस गस्त घालत असताना त्यांच्यावर शहरातील नागरिकांनी पुष्पवृष्टी करून टाळ्या वाजवत त्यांचे अभिनंदन केले.
नागरिकांकडून अकोट पोलिसांवर पुष्पवृष्टी, रक्षणासाठी मानले आभार - अकोट पोलिसांवर नागरिकांकडून पुष्पवृष्टी
अकोट शहर पोलीस आपल्या हद्दीत गस्त घालत असताना नागरिकांनी आपल्या घराच्या गच्चीवर जाऊन पोलिसांवर पुष्पवृष्टी करत टाळ्याही वाजवल्या. नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत त्यांचा उत्साह वाढवला. सोबतच तुम्ही बाहेर आहेत म्हणून आम्ही सुखरूप आहोत, असे म्हणत नागरिकांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
नागरिकांकडून अकोट पोलिसांवर पुष्पवृष्टी
अकोट शहर पोलीस आपल्या हद्दीत गस्त घालत असताना नागरिकांनी आपल्या घराच्या गच्चीवर जाऊन पोलिसांवर पुष्पवृष्टी करत टाळ्याही वाजवल्या. नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत त्यांचा उत्साह वाढवला. सोबतच तुम्ही बाहेर आहेत म्हणून आम्ही सुखरूप आहोत, असे म्हणत नागरिकांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांचे आभार मानले.
Last Updated : May 4, 2020, 4:42 PM IST