अकोला- कोरोनासंदर्भात जनजागृती व्हावी या हेतूने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी ‘कोरोना विरुद्धचे युद्ध हे जिंकू या!’ हाे गीत गायले आहे. या गाण्याच्या व्हिडिओचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले.
कोरोनाविरुद्धचे युद्ध हे जिंकू या!’ निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचा गाण्यातून प्रबोधनाचा उपक्रम
‘कोरोना विरुद्धचे युद्ध हे जिंकू या!’ या गीताच्या माध्यमातून कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले आहे.
‘कोरोना विरुद्धचे युद्ध हे जिंकू या!’ गीताचे गीतलेखन मुकूंद नितोणे यांनी केले असून व्हिडिओ संकलन विश्वास साठे यांनी केले आहे. गायन स्वतः निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे. या गीताच्या माध्यमातून कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले आहे.
नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवावे, हात स्वच्छ धुवावे, विनाकारण बाहेर फिरू नये, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा, यासह आदी उपाययोजना या गीतातून मांडण्यात आल्या आहेत. त्यासोबतच या सर्व लढाईत काम करणाऱ्या आरोग्य, पोलीस, महसूल, मनपा या सर्व विभागाच्या कार्याचे कौतुक या गीतातून करण्यात आले आहे.