अकोला -पती-पत्नीचा समेट घडवण्यासाठी आलेल्या मंडळींमध्येच महिला तक्रार निवारण केंद्रात (भरोसा) हाणामारी झाली. घटनेनंतर दोन्ही कुटुंबांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली.
पती-पत्नीचा समेट घडवण्यासाठी आलेल्या मंडळींमध्येच महिला तक्रार निवारण केंद्रात (भरोसा) हाणामारी झाली
कारंजा लाड येथील पंकज मेटकर याचा राजंदा येथील कविता गजानन पातोंड सोबत विवाह झाला होता. लग्नापासूनच पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. दोघांनीही एकमेकांना घटस्फोट देण्याच्या निर्णय घेत स्थानिक पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध तक्रार दिली.
हेही वाचा - महापुराचा फटका बसलेल्या चिखलीतील गावकऱ्यांनी केल्या मूर्तीदान
मात्र, या प्रकरणात समेट घडवून आणण्यासाठी हे प्रकरण महिला तक्रार निवारण कक्षाकडे देण्यात आले. त्यानंतर दोघांनाही सात सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. त्यानुसार विवाहिता, तिचे दोन भाऊ, वडील अशी मंडळी तर मुलाकडील, त्याचा लहान भाऊ आणि एक त्रयस्त व्यक्ती भरोसा सेलमध्ये समेटासाठी हजर झाले. यावेळी बोलणे सुरू असतानाच मेटकर आणि पातोंड कुटुंबामध्ये शाब्दीक वाद झाला.
वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. भरोसा सेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा वाद सुरुच होता.