अकोला - अकोला लोकसभा मतदारसंघात सामाजिक आणि धार्मिक स्थितीवर भाजपच्या सातत्याने विजयाची कारणे अवलंबून आहे. मतदारसंघावर खासदारांची असलेली पकड आणि त्या तुलनेत त्यांच्या विरोधी पक्षात असलेला गोंधळ खासदार संजय धोत्रे यांच्या विक्रमी विजयासाठी कारणीभूत ठरला आहे. शिवाय अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यात झालेला विलंब आणि वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्यात झालेला विलंब. या बाबीही निकालावर परिणाम करणाऱ्या ठरलेल्या आहे. त्याबद्दल ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा...
अकोला लोकसभा मतदारसंघ : ही आहेत भाजप उमेदवार संजय धोत्रे यांच्या विजयाची कारणे - अकोला
महायुतीचे उमेदवार संजय धोत्रे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचा २ लाख ७५ हजार ५९६ मतांनी पराभव केला. तसेच वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

महायुतीचे उमेदवार संजय धोत्रे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचा २ लाख ७५ हजार ५९६ मतांनी पराभव केला. तसेच वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.
भाजपच्या विजयामध्ये भाजपची मजबूत संघटन बांधणी, राजकीय पक्षांच्या तुलनेने मजबूत आणि शिस्तबद्ध संघटन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संस्थांचे जाळे, विधानसभेच्या पाचपैकी ४ मतदारसंघात भाजपची सत्ता, महापालिका, ३ नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी प्रत्येकी एक पंचायत समिती आणि नगरपालिकेतील सत्तेत भाजपचा सहभाग हे भाजपच्या विजयाचे प्रमुख कारण आहे. संजय धोत्रे यांचा शांत आणि मनमिळावू स्वभाव हा विजयासाठी महत्त्वाचा ठरला आहे.