अकोला - आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे आज (मंगळवारी) येथे धरणे आंदोलन करण्यात आले. हे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.
आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन - in akola
आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे आज (मंगळवारी) अकोला येथे धरणे आंदोलन करण्यात आले. हे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.
देशभरामध्ये ईव्हीएम मशीन विरोधात सर्वच राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. राजकीय पक्षांच्या या मागणीला मान देत निवडणूक आयोगाने भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर करावा आणि निवडणुका पारदर्शक स्वरुपात घेण्यात याव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक सचिव बाबासाहेब घुमरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते व पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.