महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गृहराज्यमंत्र्यांनी केले आदित्य ठाकरे यांचे स्वागत

वाशिमनंतर जनआशीर्वाद यात्रा अकोल्यात दाखल झाली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे रात्री 9 वाजता मुर्तिजापूर येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. बोरगाव मंजू येथील कार्यक्रम आटोपून ते हॉटेलमध्ये आले. तेथे भाजप आमदार गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हते.

By

Published : Aug 29, 2019, 3:13 AM IST

गृहराज्यमंत्र्यांनी केले आदित्य ठाकरे यांचे स्वागत

अकोला- वाशिमनंतर जनआशीर्वाद यात्रा अकोल्यात दाखल झाली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे रात्री 9 वाजता मुर्तिजापूर येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. बोरगाव मंजू येथील कार्यक्रम आटोपून ते हॉटेलमध्ये आले. तेथे भाजप आमदार गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हते.

गृहराज्यमंत्र्यांनी केले आदित्य ठाकरे यांचे स्वागत

आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रा घेऊन राज्यभर दौरा करत आहेत. विदर्भातील दौऱ्या दरम्यान ते वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील कार्यक्रम संपवून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात दाखल झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, आमदार गोपीकिशन बाजोरिया व सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर आदित्य ठाकरे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेले. तेथे भाजप आमदार गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details