अकोला -जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे शहरातील 3 ठिकाणी २ दिवसात छापे टाकण्यात आले. या छाप्यात चिट्ठीच्या माध्यामातून अवैधरित्या पैसे व मुल्यांचा व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून समोर आले आहे. या कारवाईत विभागाला २ ठिकाणावर ३७ लाख रुपये रोख आणि रक्कम टाकलेले ८५ धनादेश मिळून आले आहेत. यामुळे अवैध चिठ्ठीच्या मार्फतीने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे समोर येत असून अवैधरित्या सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
टिळक रोडवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने ही कारवाई केली. या कारवाईत चिठ्ठीच्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांसोबतच अवैध सावकारीचे व्यवहारही मिळालेल्या कागदपत्रांवरून झाल्याचे समजते. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे ही कारवाई करण्यात आली त्यांचा व्यवहार अंदाजे ५० कोटींच्या वरती असल्याची चर्चा आहे. या कारवाईने मात्र, अवैध सावकारी तसेच चिठ्ठीमार्फतीने मोठ्या प्रमाणात अवैध व्यवहार होत असल्याचे समोर येत आहे.