महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात सेनेच्या आंदोलनानंतर आमदार पोलिसांमध्ये धक्काबुक्की - akola shivsena agitation for hathras incident latest news

दोन्ही आमदार व अधिकाऱ्यांची जयहिंद चौकीत बैठक सुरू असली तरी जोपर्यंत ठाणेदारावर कारवाई होत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, असा पवित्रा आमदार बाजोरिया आणि आमदार नितीन देशमुख यांनी घेतला आहे. पोलीस चौकीबाहेर शिवसैनिक आणि पोलीस यांची गर्दी आहे.

rada between shivsena mla and psi in akola after hathras incident protest
अकोल्यात सेनेच्या आंदोलनानंतर आमदार पोलिसांमध्ये धक्काबुक्की

By

Published : Oct 3, 2020, 4:45 PM IST

अकोला -हाथरस येथील घटनेच्या विरोधात शिवसेनेने जयहिंद चौकात आज दुपारी उत्तर प्रदेश सरकारचा प्रतिकात्मक पुतळा दहन केला. पुतळा दहन कार्यक्रम संपल्यानंतर आमदार गोपिकीशन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख हे कार्यकर्त्यांसोबत उभारले असताना जूने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी सर्वांना बाजूला व्हा, वाहतूक सुरळीत करायची आहे, असे म्हटले. त्यावरून आमदार बाजोरिया आणि ठाणेदार यांच्यात शाब्दिक बाचाबाची होवून धक्काबुक्की झाली. वातावरण गरम झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिस्थिती शांत करत दोन्ही आमदार व कार्यकर्त्यांना चर्चेसाठी जयहिंद पोलीस चौकीत बसविले. परंतु, आता आमदारांनी जोपर्यंत ठाणेदारावर कारवाई होत नाही, तोपर्यंत येथून जात नसल्याची भूमिका घेतली आहे.

अकोल्यात सेनेच्या आंदोलनानंतर आमदार पोलिसांमध्ये धक्काबुक्की

हाथरस येथील घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांनी आंदोलन शांततेत पार पाडले. त्यानंतर रस्त्यावर उभे असलेल्या दोन आमदार आणि शिवसैनिकांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी बाजुला व्हा असे म्हटल्याने जुने शहर पोलीस निरीक्षक प्रकाश पवार आणि आमदार गोपोकीशन बाजोरिया यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. या प्रकारामुळे शिवसैनिक संतप्त झाले. त्यांनी ठाणेदाराला निलंबित केल्याशिवाय जाणार नाही, असा पवित्रा घेतला. परंतु, पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही आमदार आणि शिवसैनिकांना रस्त्याच्या बाजूला घेऊन शांत केले. दोन्ही आमदार व अधिकाऱ्यांची जयहिंद चौकीत बैठक सुरू असली तरी जोपर्यंत ठाणेदारावर कारवाई होत नाही, तोपर्यंत येथून जाणार नाही, असा पवित्रा आमदार बाजोरिया आणि आमदार नितीन देशमुख यांनी घेतला आहे. पोलीस चौकीबाहेर शिवसैनिक आणि पोलीस यांची गर्दी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details