महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात 1 ते 6 जून जनता कर्फ्यु - पालकमंत्री बच्चू कडू - अकोला जनता कर्फ्यु

अकोला शहरात सहा दिवस म्हणजे 1 ते 6 जूनपर्यंत ‘जनता कर्फ्यु’ करणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सांगितले.

अकोला
अकोला

By

Published : May 28, 2020, 8:12 PM IST

अकोला - कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ही साखळी तोडण्यासाठी अकोला शहरात सहा दिवस म्हणजे 1 ते 6 जूनपर्यंत ‘जनता कर्फ्यु’ करणार असल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या नियोजन भवनात ते बोलत होते. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून कठोर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत उपस्थित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मांडले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात आणखीन आरोग्य तपासणी मोहीम जोमाने राबवावी. त्यासोबतच शेतीविषयक कामे तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांनी करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.

त्यासोबतच अकोला शहरातील टिळक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेल्या कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना बियाणे विकत घेताना नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही द्याव्यात, असे ठरविण्यात आले. यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना रुग्णांना योग्य ती व्यवस्था उपलब्ध होत नसल्याची तक्रार करण्यात आली. याबाबत पालकमंत्र्यांनी सर्वच विषयांवर प्रकाश टाकून यामध्ये समन्वय साधून पुन्हा असा प्रकार होणार नाही, याच्या सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सुचनेनंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी शहरात 1 जून ते 6 जून दरम्यान जनता कर्फ्यु लावण्यात येणार असून यावेळी जीवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाने सुरू ठेवायची, की नाही याबाबत योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगितले. यावेळी भाजप, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details