महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कैदी बनले कांदा उत्पादक शेतकरी; २२ एकरात फुलवला मळा - कैदी

शेतीत एक नवा आदर्श निर्माण करण्याचे काम अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी केले आहे. वर्षभरासाठी लागणाऱया भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन हे कैदी कमाई करीत आहेत. त्याचबरोबर कैदी असतानाही शेतकरी असल्याचा अनुभव हे कैदी घेत आहेत.

केैदी बनले कांदा उत्पादक शेतकरी

By

Published : Mar 4, 2019, 9:36 PM IST

अकोला - शेती फक्त शेतकऱ्यांनीच करावी असा नियम नाही. आता खासगी व शासकीय नोकरदारही शेतीकडे वळत आहेत. याच्या पलीकडे जाऊन बंदिस्त दुनियेतील कैदीही शेती करीत आहेत. अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैदी अनेक वर्षांपासून शेती करीत आहेत. यावर्षी हे बंदिवान शेतकरी कांदा उत्पादक ठरणार आहेत. कारागृहाच्या २२ एकर जागेमध्ये त्यांनी इतर भाजीपाल्यासह १० ते १२ एकरावर कांद्याची लागवड केली आहे.

केैदी बनले कांदा उत्पादक शेतकरी

शेतीत एक नवा आदर्श निर्माण करण्याचे काम अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी केले आहे. वर्षभरासाठी लागणाऱया भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन हे कैदी कमाई करीत आहेत. त्याचबरोबर कैदी असतानाही शेतकरी असल्याचा अनुभव हे कैदी घेत आहेत. या बंदिवान शेतकऱ्यांनी कारागृहातील २२ एकर जागेवर वांगे, टमाटर, पालक, बिट यासह कांदा हे मोठ्या प्रमाणात घेतले आहे. यामुळे बंदीवानांसाठी कारागृह प्रशासनाला बाजारातून भाजीपाला आणण्याचा खर्च वाचला आहे.

ही शेती करण्यासाठी सकाळी साडेआठ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत बंदिवान शेतात राबतात. त्यांच्या श्रमाचे फळ म्हणजे कारागृहाच्या २२ एकर शेतात बहरलेला कांदा आहे. पाण्याचा मुबलक साठा असल्याने बंदिवान शेतकरी शेती करू शकत आहेत. या कांद्याच्या उत्पादनाने कारागृह प्रशासनाचा कांद्याचा प्रश्न मिटला आहे. यासोबतच गरजेपेक्षा जास्त झालेला कांदा हा इतर वाशीम आणि बुलडाणा येथील कारागृहात पाठविण्यात येणार असल्याची माहिती कारागृह प्रभारी अधीक्षक दयानंद सोरटे यांनी दिली. त्यामुळे बंदीवानाच्या सहकार्यने होणाऱ्या या शेतीने शेतकऱ्यांना ही मागे टाकले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details