महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एचटीबीटी नंतर आता शेतकरी संघटना करणार जीएम बियाण्याची पेरणी' - ललित बहाळे

महाराष्ट्र हरियाणातील हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या साक्षीने जगाला पूर्वसूचना देऊन सरकारने बंदी घातलेले एचडी बीटी कापूस बियाणे देण्यात आले होते. एक लक्ष रुपये दंड व पाच वर्षे कारावासाचा धोका पत्करून सविनय कायदेभंग या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती

शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ललित बहाळे
शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ललित बहाळे

By

Published : Jan 1, 2020, 7:51 PM IST

Updated : Jan 2, 2020, 3:43 PM IST

अकोला- जिल्ह्यातील अकोली जहागीर येथील शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेला किसान तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आता यवतमाळमध्ये आपले सत्यागृह आंदोलन सक्रिय करणार आहे. 10 जून 2019 ला त्यांनी एचटीबीटी कापूस बियाण्याची पेरणी करून हे आंदोलन सुरू केले होते. या घटनेला सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर आता ही शेतकरी संघटना यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी तालुक्यात जी एम बियाणे पेरून आपल्या सत्याग्रही आंदोलनाला बळकट करणार आहे. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ललित बहाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.

शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ललित बहाळे

बहाळे पुढे म्हणाले, महाराष्ट्र हरियाणातील हजाराहून अधिक शेतकऱ्यांच्या साक्षीने जगाला पूर्वसूचना देऊन सरकारने बंदी घातलेले एचडी बीटी कापूस बियाणे देण्यात आले होते. एक लक्ष रुपये दंड व पाच वर्षे कारावासाचा धोका पत्करून सविनय कायदेभंग या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती. अमरावती जिल्ह्यातील पुसदा, अंजनगाव तालुक्यातील कारला मोर्शी तालुक्यातील निंबी येथील शेतकऱ्यांनी जाहिरपणे लागवड करून सविनय सत्याग्रहात शेतकरी महिलांचे भाग घेतला होता.

विदर्भ मराठवाड्यातील सर्व कापूस जिल्ह्यात शेतकऱ्यांनी जाहीरपणे एचटीबीटी लागवड करून सत्याग्रहात सहभाग नोंदवला. तसेच चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात जिथे तनमाजोळीमुळे कापूस पिकवणारे अशक्यप्राय मानले जाते; तिथे एचटी बीटी कापसाच्या रुपाने शेतकऱ्यांना एक पर्याय उपलब्ध झाला, असे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्याची क्षमता जनुकीय तंत्रामध्ये आहे. जीएम बियाण्यामुळे होऊ शकणाऱ्या पर्याय विस्ताराच्या उपयोगाने भारतीय शेतकऱ्यांना जागतिक पातळीवर स्पर्धेला तोंड देण्यासाठी क्षमता प्राप्त होईल. मात्र, जनुकीय तंत्रज्ञान व त्यातील प्रयोगांवर अनुसंधान वर बंदी लावणे अन्यायकारक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी तालुक्यात जीएम पिकासंदर्भातील एक महोत्सव येत्या 5 जानेवारीला घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अकोट तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे एक शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले असल्याचेही ललित बहाळे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राज्य प्रवक्ता शेतकरी संघटना विलास ताथोड, लक्ष्मीकांत कौठकर, सुरेश जोगळे, डॉ. निलेश पाटील, अविनाश नाकट हे उपस्थित होते.

Last Updated : Jan 2, 2020, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details