अकोला - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याबाबत अनेक आडाखे बांधले जात असताना अखेर त्यांनी आज याबाबत सुचक वक्तव्य केले आहे. ते अकोला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा मंगळवारी मुंबईत करणार असल्याचे स्पष्ट केले. आंबेडकरांनी सोलापूरमधून लढण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसच्या अडचणींमध्ये मात्र वाढ होणार असल्याचे दिसत आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार? प्रकाश आंबेडकर यांचे सुचक वक्तव्य - बहुजन महासंघा
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी युती यांची चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांच्या मंगळवारी होणाऱ्या घोषणेने युतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची ओळख काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून असल्याने आता शिंदेंच्या अडचणीतही वाढ होणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी युती यांची चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांच्या मंगळवारी होणाऱ्या घोषणेने युतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची ओळख काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून असल्याने आता शिंदेंच्या अडचणीतही वाढ होणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे यांनी शिंदे यांचा मानहानीकारक पराभव केला होता. आता आंबेडकरांचेही आव्हान उभे राहिल्यास काँग्रेससाठी हा सामना अधिक कठीण होईल. दरम्यान, सोलापूरमधील आंबेडकरांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आंबेडकर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात मते मिळवू शकतील असाही अंदाज वर्तवला जात आहे.