अकोला -कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना तिसरी लाट येत असल्याचे वैद्यकीय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये लहान मुलांना कोरोना होण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तविली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतच वैद्यकीय सेवा कोलमडली असताना लहान बालकांचे संरक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज बालरोग तज्ञांची बैठक घेतली. या बैठकीत आलेल्या सूचनांची माहिती मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना हा धोका टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे सांगणार असल्याचे त्यांनी बालरोगतज्ज्ञ यांना आश्वस्त केले.
कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाट : बालकांना वाचविण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी घेतली बालरोग तज्ज्ञांची बैठक - प्रकाश आंबेडकरांनी घेतली डॉक्टरांटची बैठक
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना तिसरी लाट येत असल्याचे वैद्यकीय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यामध्ये लहान मुलांना कोरोना होण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तविली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतच वैद्यकीय सेवा कोलमडली असताना लहान बालकांचे संरक्षण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज बालरोग तज्ञांची बैठक घेतली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 18 वर्षा खालील बालकांमध्ये विषाणूंचे संक्रमण मोठ्या प्रमाणात असू शकते, असे सुद्धा सांगण्यात येत आहे. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 45 च्या वरील वृद्ध रुग्णाच्या मृत्यूची संख्या सर्वांच्या डोळ्याला टोचणारी होती. परंतु, करोनाच्या तिसऱ्या लाटेत मात्र 18 वर्षाखालील बालके आणि युवा सर्वात जास्त संक्रमित होणार आहेत, असे वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने त्यांना जर योग्य उपचारात मिळाले नाहीत, तर प्रत्येकाच्या परिवाराला मोठ्या जीवितहानीचा सामना करावा लागणार आहे.
या तिसऱ्या लाटेची येणारी परिस्थिती बघता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील नामवंत बालरोग तज्ञ आणि लेबेन लॅबोरेटरीचे संचालक यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत 18 वर्षा खालील बालकांच्या व युवांच्या उपचाराची एक निश्चित दिशा असावी आणि या तिसऱ्या लाटेच्या परिस्थितीत उपचारात आलेली 0 ते २ वर्षाच्या खालील बालकांच्या स्तनपान उपयोजना कशा प्रकारे असेल. तसेच संक्रमित बालकांपासून असंक्रमित मातेची सुरक्षा व उपयोजना, संक्रमित झालेल्या युवकांना व बालकांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि अन्य उपचारात लागणारी व्यवस्था कमी पडणार नाही. तसेच उपचारात येणाऱ्या औषधीचा गैर परिणाम रोखणे या व विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी उपस्थित बाल रोग तज्ज्ञांनी नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करतील, असे आश्वासित केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. एन के माहेश्वरी, डॉ. अविनाश तेलगोटॆ, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. धर्मेंद्र राऊत, डॉ. पार्थसारथी शुक्ल, डॉ. पराग डोईफोडे यांच्यासह बालरोगतज्ज्ञ तसेच औषधी निर्माण करणारी लेबीन कंपनीचे संचालक हरीश शहा यांच्याशी उपचारात लागणाऱ्या औषधी दर्जा आणि पुरवठा प्रमाण या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी रुग्णकल्याण समिती सदस्य पराग गवई उपस्थित होते.