महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...तर नाभिक समाज रस्त्यावर उतरून व्यवसाय करणार - Barbers community issue in Maharashtra

टाळेबंदीची नाभिक समाजाला सर्वात जास्त झळ पोहोचत आहे. सध्या जवळपास सर्वच दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, केशकर्तनालय व ब्युटी पार्लर यांना परवानगी देण्यात आली नाही.

प्रकाश आंबेडर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित
प्रकाश आंबेडर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित

By

Published : Jun 19, 2020, 5:48 PM IST

अकोला - सध्या टाळेबंदीच्या काळात अनेकांचे व्यवसाय व रोजगार बंद पडले आहेत. जिल्ह्यातील नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. नाभिक समाज संकटात असताना त्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मदत केली नाही, तर ते रस्त्यावर उतरून व्यवसाय करतील, असा इशारा आंबेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

टाळेबंदीची नाभिक समाजाला सर्वात जास्त झळ पोहोचत आहे. सध्या जवळपास सर्वच दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, केशकर्तनालय व ब्युटीपार्लर यांना परवानगी देण्यात आली नाही. यामुळे जिल्ह्यातील नाभिक समाज अडचणीत सापडला आहे. या समस्येबाबत प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत जिल्ह्यातील केशकर्तनालय व ब्युटी पार्लर सुरू करण्यासाठी चर्चा केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केशकर्तनालाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्या धर्तीवर जिल्ह्यातही सर्व केशकर्तनालय व ब्युटी पार्लर उघडण्याची परवानगी द्यावी, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचविले.

अकोट येथे उपासमारी व आर्थिक विवंचनेतून एका नाभिकाने आत्महत्या केली आहे. याकडे आंबेडकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी नाभिक समाजाला तत्काळ दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली. नाभिक समाजातील लोकांना मोफत अन्नधान्य व आर्थिक मदत करावी, अशी आंबेडकर यांनी आग्रही मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, कोरोनाग्रस्त भागातील आरोग्य तपासणीसाठी 'वंचीत'तर्फे डॉक्टर उपलब्ध करून देण्याचा मानस ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. यावेली प्रदेश प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई, युवा नेता पराग गवई, नाभिक समाजाचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर इंदुरकर, प्रशांत भातखडे, गजानन ओलोकार, संतोष पंडित, हरीहर पळसकर व गजानन येवतकर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details