अकोला- देशातील सर्वच डाळीचे दर गगनाला पोहोचले होते. परिणामी सामान्य नागरिकांसाठी डाळ खरेदी करणे अशक्य झाले होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने सर्वच डाळीच्या आयातीला परवानगी दिली होती. या परवानगीमुळे देशातील डाळीचे भाव कमी झाले आहे. दरम्यान, तूर, हरभरा, मुंग, उडीद, मसूर बरबीटी डाळीच्या भावात घट झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे हे आयातीचे धोरण रद्द करावे, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने गुरूवारी सिटी कोतवाली चौकात ताली-थाली बजाओ आंदोलन केले आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
'प्रहार'चे 'ताली-थाली बजाओ' आंदोलन शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणार नाही
मात्र, जेव्हा बाजारात पुन्हा डाळीचे पीक येईल, त्यावेळी मात्र शेतकऱ्यांना त्याचा योग्य भाव मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिटी कोतवाली चौकात ताली-थाली बजाओ आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते.
हेही वाचा -'बार्ज पी३०५' LIVE Updates : आतापर्यंत ४९ मृतदेह मिळाले; २६ जणांचा शोध सुरुच..