अकोला - परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानाची भरपाई व इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी बैलगाडीत आणलेली ज्वारीचे कणसे पेटवून रोष व्यक्त केला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत द्या, प्रहार जनशक्तीचा अकोला तहसीलवर मोर्चा - major loss farmer crops
परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानाची भरपाई व इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी बैलगाडीत आणलेली ज्वारीचे कणसे पेटवून रोष व्यक्त केला.
ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी २५ हजार मदत द्या, सरसकट कर्जमाफी करा, पिकविमा जाहीर करा, मागील वर्षीचा दुष्काळ निधी त्वरित द्या, मुग, उडीद, पिकांचे पंचनामे न होवू शकल्यामुळे त्यांचे नुकसान ग्राह्य धरून अनुदान तसेच पिकविमा द्या,पंतप्रधान सन्मान योजनेचा निधी शेतकऱ्यांचा खात्यामध्ये त्वरित जमा करा, अतिक्रमण घरकुल लाभार्थ्यांना लाभ द्या, शैक्षणिक शुल्क माफ करा अशा विषयावर प्रहारकडून तेल्हारा तहसील येथे घेराव आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वाखाली करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.