अकोला - चोरी झालेल्या व वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना थांबवून कागदपत्रे सादर न केलेल्या दुचाकी या चोरीच्या निघाल्याची बाब समोर आली आहे. शहर वाहतूक शाखेने या दुचाकी मालकांचा शोध घेऊन त्या त्यांच्या स्वाधीन केल्या आहेत. चोरीला गेलेल्या दुचाकी परत मिळाल्याने दुचाकी मालकांना आनंद व्यक्त केला.
वाहतूक शाखेच्या परिसरात बेवारस मिळालेल्या दुचाकी निघाल्या चोरीच्या, पोलिसांनी मूळमालकांना केल्या परत
जप्त केलेल्या तब्बल पाच दुचाकी या चोरीच्या निघाल्या आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी या दुचाकी मालकांच्या शोधासाठी एक पथक तयार केले. या पथकाने आपले कर्तव्य पार पाडीत पाचही दुचाकी मालकांचा शोध घेतला आहे. त्यामध्ये तीन दुचाकी या अमरावती जिल्ह्यातील, एक अकोला, एक पुणे येथील होत्या. दुचाकी त्यांना परत करण्यात आल्या आहेत.
शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. दुचाकी चोरली की चोरटा जोपर्यंत त्या दुचाकीतील इंधन संपत नाही, तोपर्यंत ती घेऊन जातो. या दरम्यान जर वाहतूक पोलिसांनी हटकले तर तो कागदपत्रे घरी राहिल्याचे सांगतो. त्यावेळी वाहतूक पोलीस ती दुचाकी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात जमा करतो. अशा प्रकारे जप्त केलेल्या तब्बल पाच दुचाकी या चोरीच्या निघाल्या आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी या दुचाकी मालकांच्या शोधासाठी एक पथक तयार केले. या पथकाने आपले कर्तव्य पार पाडीत पाचही दुचाकी मालकांचा शोध घेतला आहे. त्यामध्ये तीन दुचाकी या अमरावती जिल्ह्यातील, एक अकोला, एक पुणे येथील होत्या. दुचाकी त्यांना परत करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, पाच दुचाकी मालकांनी विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर दोन दुचाकी मालकांनी तक्रार दाखल केली नाही. तर त्यांना त्यांच्या दुचाकी या प्रतिज्ञापत्रावर देण्यात आल्या आहेत. त्यातील एक दुचाकी मालक हा अत्यंत गरीब असल्याने प्रतिज्ञापत्राचा खर्च ही वाहतूक पोलिसांनी पैसे जमा करून त्यांना दिला.