अकोला - घरीच धारदार शस्त्र बनवून ते विक्री करणाऱ्यांवर आज पहाटे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने गवळीपूरा येथे कारवाई केली. या कारवाईत अब्दुल इमरान अब्दुल लतीफ यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 22 शस्त्रे आणि ते बनवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
घरातच धारदार शस्त्रे बनवणाऱ्याला अटक; २२ तलवारी जप्त - अकोला लेटेस्ट न्यूज
घरातच धारदार शस्त्र बनवणाऱ्यांवर अकोल्यातील विशेष पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यात त्यांनी 22 विविध प्रकारचे शस्त्र आणि ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ असलेल्या गवळीपूरा येथे अब्दुल इमरान अब्दुल लतीफ हा शस्त्रे बनवीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद बाहकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर त्यांनी संबधित ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात त्यांनी 22 विविध प्रकारचे शस्त्र आणि ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.
विशेष पथकाच्या कारवाईनंतर रामदास पेठ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या ठाण्यातील डीबी पथक, खुपिया विभाग नेमके कोणते 'कर्तव्य' बजावत आहेत, असा सवाल निर्माण झाला आहे. अब्दुल इमरानने कोणाकोणाला हे शस्त्र विकेल आणि केव्हापासून तो काम करीत आहे. त्याचे साथीदार कोण, त्याचे एजंट कोण, हे जर रामदास पेठ पोलिसांनी शोधून काढले, तर यामागील अनेक जण जेरबंद होवू शकतात. विशेष म्हणजे, या प्रकरणात इतरही गुप्तहेर संस्था लक्ष घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.