महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जुगार खेळणाऱ्यांवर विशेष पथकाची कारवाई; नऊ जणांकडून दीड लाखांचा ऐवज जप्त - अकोला पोलीस कारवाई

आडगाव येथील उंबर शेवळी रस्त्यालगतच्या शेतात सुरू असलेल्या जुगारावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा टाकला.

police raid on gamblling akola
जुगार खेळणाऱ्यांवर विशेष पथकाची कारवाई

By

Published : Apr 21, 2020, 7:28 AM IST

अकोला- आडगाव गावाजवळील शेतात जुगार खेळणाऱ्यावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने कारवाई केली. या कारवाईत नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एक लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आडगाव येथील उंबर शेवळी रस्त्यालगतच्या शेतात सुरू असलेल्या जुगारावर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या छाप्यात नऊ जणांवर कारवाई करीत पाच दुचाकीसह इतर साहित्य असे एक लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये पथकाने संतोष विश्वनाथ गावंडे, शहादेव सुखदेव गव्हाळे, अक्षय गणेश बोडखे, नागोराव भिमराव खुमकर, विश्वनाथ जगन्नाथ मसुरकर, केवल देशमुख, अशोक बोडखे यांच्यासह आदींवर कारवाई केली आहे. या सर्वांवर हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details