अकोला -अनभोरा शिवारातील राजेश पिल्ले यांच्या शेतातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये ७ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २ लाख ७३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपींवर मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, ७ जणांना अटक - पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
अकोला जिल्ह्यातील अनभोरा येथील राजेश पिल्ले यांच्या शेतात ३ पत्ती परेल नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
राजेश पिल्ले यांच्या शेतात ३ पत्ती परेल नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये राजेश शंकर पिल्ले, दिनेश गोपाल शुक्ला, बक्कू कोळीराम गुजांळ, शेख ईरफान शेख कयूम, भारत येलया गुंजाळ, अनील सुखदेव चऱ्हाटे, श्याम गोपालराव अघाते यांना अटक केली. त्यांच्याकडून २८ हजार ३०० रुपये तसेच २ लाख १५ हजार रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या एकूण ५ दुचाकी, ३० हजार रुपये किंमतीचे एकूण ७ मोबाईल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.