महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष पथकाचा दोन जुगार अड्ड्यावर छापा; 18 जणांसह लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - जुगार अड्डा

पिंजर, हातोला या 2 गावांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी छापा टाकला. या छाप्यात पथकाने 16 जणांवर गुन्हा दाखल केला असून 150 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, दुसरी कारवाई उगवा फाटा येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दोघांवर करण्यात आली.

छापा

By

Published : Sep 1, 2019, 4:57 AM IST

अकोला - पिंजर, हातोला या 2 गावांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी छापा टाकला. या छाप्यात पथकाने 16 जणांवर गुन्हा दाखल केला असून 150 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर, दुसरी कारवाई उगवा फाटा येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दोघांवर करण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिलेले असतानादेखील मोकटपणे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाला ठाणेदार जुमनत नसल्याचे दिसून येते.

विशेष पथकाचा दोन जुगार अड्ड्यावर छापा


पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंजर, हातोला येथे सुरू असलेल्या राजेश देशमुख व दिपक इंगळे यांच्या वरली मटक्याचे अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी वैभव गजानन गिरी, विठ्ठल जगतराव हातोलकर, वासुदेव नागोजी चोरीपगार, उदयसिंग जमला राठोड, ओंकार संपत नेमाडे, रामचंद्र साधु राठोड, नामदेव श्रीराम काळे, संतोष सखाराम ढवळे, राजु शामराव विजयकर, पंडीत शिवराम ठाकरे, अंबादास कालीदास भारस्कर, प्रकाश लहुजी भगत, विष्णु किसण लोणाग्रे, रमेश देशमुख, दीपक इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल केला. यातील अड्ड्याचा मालक हा फरार झाला. पथकाने 8 हजार 550 रुपये रोख, 22 हजार रुपयांचे 9 मोबाईल, 20 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 50 हजार 550 रुपये जप्त करण्यात आले.


तर, दुसरी कारवाई अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उगवा फाट्याजवळ येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर करण्यात आली. यात, अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांकडून 216 देशीदारूचे 11 हजार 232 रुपये किंमत असलेले क्वाटर, 45 हजार रुपयांची दुचाकी आणि 2 हजार रुपयांचा 1 मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. पथकाने या कारवाईत नितीन भगवान केवट, किशोर शहादेव सांळुके यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पथकाचे प्रमुख मिलिंद बाहकर यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details