अकोला -एसटी प्रशासनाद्वारे होत असलेली कारवाई रद्द करून देतो, अशा भुलथापा देऊन वकील गुणरत्न सदावर्ते याने एसटी कर्मचार्यांकडून 300 रुपये आणि 500 रुपये जमा ( ST employees money collection ) केले. या प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांनी अकोट शहर पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्ते विरोधात फसवणुकीचा ( Gunratna Sadavarte case in Akot ) गुन्हा दाखल केला आहे.
अकोट आगारातील प्रफुल्ल गावंडे यांच्या माध्यमातून अजयकुमार बहादुरसिंग गुजर (रा. विनायक पार्क जवळ, देवळाई रोड, जि. औरंगाबाद), अॅड. गुणरत्न सदावर्ते (रा. मुंबई), अॅड. जयश्री पाटील (रा. मुंबई) यांच्याकडे 74 हजार 400 रुपये कर्मचार्यांकडून जमा करण्यात ( ST employees cheating case ) आले आहे. याप्रकरणी कर्मचार्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात ( case against Gunaratna Sadavarte ) आला आहे.
महामंडळात बेकायदेशीर पद्धतीने संपाची नोटीस-विजय मालोकार यांनी 8 जानेवारी 2022 रोजी अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. एसटी महामंडळात 5 महिन्यांपासून बेकायदेशीरपणे संप सुरू आहे. या संपादरम्यान, काही कर्मचारी, पदाधिकारी हे वेगवेगळ्या नागरिकांमार्फत आर्थिक शोषण करून कर्मचार्यांची फसवणूक करीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. अजयकुमार गुजर (45, रा. गट नं. 81, विनायक पार्क जवळ, देवळाई रोड, बिड बायपास, औरंगाबाद) हे एसटी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहेत. महामंडळात बेकायदेशीर पद्धतीने संपाची नोटीस देऊन एसटी कर्मचाऱ्यांनी संपाला सुरवात केली.
3 कोटी रुपये असल्याचा अंदाज -संपकरी कर्मचार्यांना निलंबित व बदली करण्याचे आदेश राज्य परिवहन प्रशासनाने काढले. त्यातून सुटका व्हावी, आपल्यावरील उपरोक्त कार्यवाही रद्द व्हावी, याकरिता कर्मचार्यांमार्फत प्रयत्न सुरू झाले होते. कर्मचार्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन अजयकुमार गुजर आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात प्रकरण दाखल केले. प्रशासनाद्वारे होत असलेली उपयोक्त कार्यवाही रद्द करून देतो, अशा भूलथापा देऊन कर्मचार्यांकडून 300 रुपये व 500 रुपये जमा केले. त्यामध्ये राज्यभरातील जवळपास 70 हजार एसटी कर्मचार्यांकडून गोळा केलेली रक्कम 3 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना भुलथापा- अकोट आगाराचे गजानन रामभाऊ बढे ( रा. कृष्णार्पण कॉलनी,अकोला रोड, अकोट) आणि अकोट आगाराच्या इतर कर्मचार्यांद्वारे 74 हजार 400 रुपये संकलित करण्यात आले होते. 14 नोव्हेंबर 2021 रोजी अकोट डेपो येथे वाहक म्हणून नेमणुकीवर असलेल्या प्रफुल्ल गावंडे (रा. नवलेवाडी समोर, अवधुतर कॉलनी, अकोट) याने अजयकुमार गुजर याच्या बँक खात्यामध्ये वळती केली. प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेले कार्यवाही रद्द करून देतो, असे खोटे आश्वासन व भुलथापा देऊन अजयकुमार गुजर आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी प्रकरण न्यायालयात दाखल केले नव्हते.