महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 24, 2021, 10:51 PM IST

ETV Bharat / state

रेमडेसिवीरचा काळाबाजारा करणाऱ्या पाच आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी

रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी 29 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अकोला एलसीबीच्या पथकाने काल (शुक्रवारी) छापा मारुन रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली होती. या प्रकरणातील आरोपी खासगी रुग्णालयाशी संबंधित असल्याने यामध्ये रुग्णालयांचे कनेक्शन असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

आरोपींना अटक
आरोपींना अटक

अकोला - कोरोना आजारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच आरोपींना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अकोला एलसीबीच्या पथकाने काल (शुक्रवारी) छापा मारुन रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली होती. या प्रकरणातील आरोपी खासगी रुग्णालयाशी संबंधित असल्याने यामध्ये रुग्णालयांचे कनेक्शन असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील रामनगर भागात इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आशिष समाधान मते हा तरुण विना कागदपत्रं, बील तसेच डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शनशिवाय इंजेक्शन विकत असल्याचे कळले. चार हजार रुपयाचे हे इंजेक्शन 25 हजार रुपये प्रति इंजेक्शन विकताना हा आरोपी रंगेहात पकडला गेला. पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणांमध्ये राहुल गजानन बंड, सचिन हिंमत दामोदर, प्रतिक सुरेश शहा, अजय राजेश आगरकर या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. तीन आरोपी औषधी दुकानात कामावर असून दामोदर हा 'ओझोन' मध्ये तर आगरकर हा ‘देशमुख मल्टी स्पेशालिस्ट’ येथे काम करतात. आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये 3 रेमडेसिवीर इंजेक्शनचा समावेश आहे.

अन्न व औषधी प्रशासन विभागातील औषध निरीक्षक संजय मोहन सिंग राठोड यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. सिव्हील लाइन पोलीस ठाण्यामध्ये या पाचही आरोपी विरुद्ध औषधी व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, औषधे किंमत नियंत्रण अत्यावश्यक वस्तू सेवा अधिनियम या कलमांखाली गुन्हे नोंदविले आहेत. या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details