महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसाच्या घरात चोरी;  चोरट्यांनी भरदिवसा मारला १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

चांदीच्या दागिन्यांकडे त्यांनी पाहीले ही नसल्याचे दिसते. चांदीचे दागिने तसेच पडलेले होते. ही चोरी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची झाल्याचे दिसते. खदान पोलीस, ठसे तज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

चोरट्यांनी भरदिवसा मारला १८ तोळे सोन्यावर डल्ला

By

Published : May 4, 2019, 2:52 PM IST

अकोला - बाहेरगावी गेलेल्या पोलिसाच्या घरातच शुक्रवारी भरदिवसा चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये १८० ग्रॅम सोने आणि २० हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना जुने खेतन नगरात घडली. या घटनेमुळे चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांच्या घरीच चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. तसेच नागरिकांना मौल्यवान वस्तू घरी न ठेवण्याचा सल्ला देणाऱ्या पोलिसासाठी हा नियम लागू नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंकज भाऊराव पवार यांच्याकडे ही चोरी झाली.

चोरट्यांनी भरदिवसा मारला १८ तोळे सोन्यावर डल्ला

पंकज पवार हे अमरावती येथे सहकुटुंब शुक्रवारी दुपारी गेले होते. रात्री ते परत आले असता त्यांच्या घराचे प्रवेशद्वार तोडून घरातील कपाटांमधून १८० ग्रॅम सोने आणि २० हजार रुपयांची रोख चोरट्यांनी चोरून नेली. ते घरी परत आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी खदान पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ही चोरी दुपारी झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी कपाटातील सोन्याच्या दागिने चोरले. चांदीच्या दागिन्यांकडे त्यांनी पाहीले ही नसल्याचे दिसते. चांदीचे दागिने तसेच पडलेले होते. ही चोरी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची झाल्याचे दिसते. खदान पोलीस, ठसे तज्ञ आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पंकज पवार हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. या चोरीने चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. या घटनेने खदान पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेंच जे पोलीस नागरिकांना चोरीच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची शिकवण देतात, त्यांच्याकडेच हा प्रकार घडल्याने आता पोलिसांना पण हेच शिकविण्याची गरज असल्याचे दिसून येते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details