अकोला-जुनेशहरातील बिलत कॉलनी येथे विजय पान सेंटर येथे उभ्या असलेल्या एका युवकाकडून विदेशी बनावटीचा देशी कट्टा आज जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली असून पुढील कारवाई जुने शहर पोलीस करत आहे.
हेही वाचा-अकोल्यातील दोन सराफा व्यापारी मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात
तन्वीर अहमद ऊर्फ सोनू जहांगीर खान हा देशी कट्टा) घेऊन बिलत कॉलनी मधील विजय पान सेंटर जवळ उभा होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मोठ्या शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ विदेशी बनावटीचा देशी कट्टा मिळून आला. त्याला याबाबत परवाना असल्याचे विचारल्यास त्याने नकार दिला. पोलिसांनी त्यांच्याजवळील देशी कट्टा जप्त केला असून त्याला अटक केली आहे.
जुने शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, अशोक चाटी, राजपालसिंग ठाकूर, नितीन ठाकरे, रफिक शेख, इजाज अहमद, रवी इरचे, संदीप तवाडे, अब्दुल माजिद, नफिस शेख यांनी केली.