महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 24, 2020, 3:28 PM IST

ETV Bharat / state

आगामी उत्सवात शांतता भंग होऊ नये यासाठी पोलीस दल सतर्क

अकोला पोलीस दलामध्ये विविध स्तरांवर गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू आहे. 'सोशल पोलिसिंग' तक्रारदारास योग्य प्रतिसाद मिळत आहे किंवा नाही याची चौकशी केली जात आहे. तपासाच्या दृष्टीनेही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

अकोला
अकोला

अकोला- आगामी उत्सवांमध्ये शांतता भंग होऊ नये, यासाठी पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. शांतता समिती सदस्यांच्या बैठका घेऊन उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच ईद-ए-मिलाद संदर्भात शासनाने दिलेल्या नियमानुसारच हा सण साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

माहिती देताना पोलीस अधीक्षक
अकोला पोलीस दलामध्ये विविध स्तरांवर गेल्या काही महिन्यांपासून काम सुरू आहे. 'सोशल पोलिसिंग' तक्रारदारास योग्य प्रतिसाद मिळत आहे किंवा नाही याची चौकशी केली जात आहे. तपासाच्या दृष्टीनेही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. दामिनी पथक यांच्याही कार्यात बदल करण्यात आला आहे. या पथकाला नवीन व्हाट्सअ‌ॅप क्रमांक देण्यात आला आहे. त्यासोबतच इतर आघाडीवरही अकोला पोलीस दल काम करीत आहे.

शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात येणारे उपक्रम हे योग्य पद्धतीने सुरू असल्याचे कौतुकही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले. तपासाच्या दृष्टिकोनात स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथक यांच्याकडूनही वेळोवेळी कारवाई होत आहे. टोळी गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करून अशा गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्याचा गुन्हेगारीचा आलेख कमी होईल, असेही पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ हे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details