अकोला - अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज नाकबंदी करून ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोघांविरोधात उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, 65 हजारांचा मुद्देमाल जप्त - illegally liquor news in akola
अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज नाकबंदी करून ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कारंजा येथील देशी दारूच्या दुकानातून अवैधरित्या दारू विक्रीसाठी येत असल्याची माहिती, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने कारंजा ते हातरुन या रस्त्यावर नाकबंदी केली. एका दुचाकीवर 2 व्यक्ती जात असताना त्यांना तपासण्यात आले. पथकाला त्या दोघांकडून 180 मिली. 288 क्वाटर किंमत 14 हजार 976 रुपये मिळून आले. पोलिसांनी अनिल बाजीराव डोंगरे, शेख बन्नू अब्दुल गणी या दोघांकडून 50 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 64 हजार 976 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर त्या दोघांवर उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.