महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यस्तरीय 'थ्रो बॉल' स्पर्धेत भ्रष्टाचार झाल्याचा खेळाडूंचा आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे - राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धा

राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धा यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुलात ३ ते ६ नोव्हेंबर दरम्यान पार पडली. १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेतून राष्ट्रीय संघाची निवड करण्यात आली. या निवड समितीमधील सदस्य अपात्र असल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे.

agitation
खेळाडूंचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

By

Published : Nov 27, 2019, 4:12 AM IST

Updated : Nov 27, 2019, 4:39 AM IST

अकोला - राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेदरम्यान राष्ट्रीय संघाच्या निवड प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत खेळाडूंनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. निवड समितीमधील सदस्यांच्या पात्रतेच्या चौकशीसह स्पर्धा पुन्हा घेण्याची मागणी खेळाडूंनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

हेही वाचा - आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप : अतानू दासची 'खास' कामगिरी, जिंकली ३ कांस्यपदके

राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धा यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुलात ३ ते ६ नोव्हेंबर दरम्यान पार पडली. १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेतून राष्ट्रीय संघाची निवड करण्यात आली. या निवड समितीमधील सदस्य अपात्र असल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. थ्रो बॉल खेळामध्ये कोठे आणि कोणकोणत्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, या स्पर्धांचे प्रशिक्षक आणि प्रमाणपत्रांची चौकशी आणि पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी खेळाडूंनी केली आहे. याबाबतचे निवेदन खेळाडूंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केले.

हेही वाचा - २६/११ दहशतवादी हल्ला : विराटसह 'या' क्रिकेटपटूंनी वाहिली शहिदांना आदरांजली

तुषार कांचन, यश जोशी, हर्षद ठाकूर, अजय देहाडे, सौरभ वाघमारे, ईश्वर टाक, अजय टाक, आशिष थोरात, कुंदन तिवारी, विनय लाड, रवी मेश्राम हे खेळाडू या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.

Last Updated : Nov 27, 2019, 4:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details