महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना करा - विभागीय आयुक्त

मुंबई, पुणे यासारख्या शहरांमधून परतलेल्या नागरिकांवर काटेकोर लक्ष ठेवा. जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढ रोखणे, मृत्यूदर कमी करणे यावर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

review meeting of divisional commissioner
विभागीय आयुक्तांची आढावा बैठक

By

Published : May 30, 2020, 9:16 AM IST

अकोला - जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीचा आढावा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी घेतला. कोरोना विषाणू प्रादुर्भाव वाढण्याची कारणे, जिल्ह्यातील उपचार सुविधा व विलगीकरणाच्या सुविधा, वैद्यकीय उपचार यंत्रणेतील मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, सुरक्षासाधनांची आवश्यकतासह मुंबई, पुणे यासारख्या शहरांमधून परतलेल्या नागरिकांवर काटेकोर लक्ष ठेवा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढ रोखणे, मृत्यूदर कमी करणे यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे,असे ते म्हणाले.

कोरोना उपचार पद्धतीसंदर्भात इंडियन मेडीकल कौन्सिल कडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांचा काटेकोर अवलंब करा. मुंबई पुणे यासारख्या शहरांमधून परतलेल्या नागरिकांवर काटेकोर लक्ष ठेवा. जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढ रोखणे, मृत्यूदर कमी करणे यावर विशेष लक्ष द्या. जे जे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत त्या त्या रुग्णांना उत्तम जेवण व अन्य सेवा पुरवा, या सूचना आयुक्तांनी केल्या.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात यावी व मनुष्यबळ वाढवावे. रुग्णालयांचे निर्जंतूकीकरण, स्वच्छता याबाबींवर विशेष लक्ष द्या, अशा सूचना सिंग यांनी केल्या.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व लोकांना नॉन कोव्हिड उपचार सुविधा उपलब्ध आहेत. या योजनेत जे जे खासगी रुग्णालये संलग्नित असतील, त्या रुग्णालयांमध्ये कोव्हिड व्यतिरिक्त अन्य उपचार सुविधा सुरू करा व त्या सुविधा देण्यास सुरुवात करा. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. अष्टपुत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details