अकोला - बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या शेजारी गुलतुरा पांदण रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास मोठी आग लागली. हळूहळू ही आग बसस्थानक आणि पोलीस निवासस्थानाजवळ पोहोचली. मात्र, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथक तसेच ग्रामस्थांना आग विझवण्यात यश मिळाले. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
बार्शीटाकळी तालुक्यात पिंजर येथे भीषण आग, जीवितहानी नाही - पिंजर बार्शीटाकळी
आगीने जवळपास ३-४ एकराचा परिसर विळख्यात घेतला होता. मात्र, गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. आज अकोल्याचे तापमान ४६.४ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुरुवातीला जिल्हा परिषद कन्या शाळेच्या बाजुने गुलतुरा पांदण रस्त्यावर आग लागली. त्यानंतर या आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याची माहिती वासुदेव वेरुळकार यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन आगीचे ठिकाण गाठले. एवढेच नाहीतर सदाफळे यांनी पोलीस निवसास्थानापासून ते जिनींग प्रेसिंगच्या कम्पाउंडपर्यंत ५ फूट रुंदीचा गॅप पाडून घेतला. त्यामुळे बसस्थानाकडे येण्यापासून थांबवण्यात आले. मात्र, बाकी परिसरात आग धगधगत होती. आगीने जवळपास ३-४ एकराचा परिसर विळख्यात घेतला होता. मात्र, गावकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. आज अकोल्याचे तापमान ४६.४ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.