अकोला- लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असले तरी मास्क आणि सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे. मात्र, हे नियम अकोल्यात पाळले जात नसल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलीस आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, सामान्य नागरिक जबाबदारीने वागताना दिसत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना नागरिकांचा हा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो.
पूर्वपदावर येणाऱ्या वाहतुकीत नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; पोलिसांसमोर आवाहन - अकोला कोरोना अपडेट
तीन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर केंद्र सरकार, राज्य सरकारने हळूहळू टाळेबंदीत शिथिलता दिली. शिथिलता देताना मात्र सॅनिटायझर वापरावे, सोशल डिस्टनसिंग पाळावे, तोंडांवर मास्क बांधावे आदी नियम घालून दिले. परंतु, परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शासनाने दिलेल्या नियमांकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे.
तीन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर केंद्र सरकार, राज्य सरकारने हळूहळू टाळेबंदीत शिथिलता दिली. शिथिलता देताना मात्र सॅनिटायझर वापरावे, सोशल डिस्टनसिंग पाळावे, तोंडांवर मास्क बांधावे आदी नियम घालून दिले. तर वाहनचालकांनी डबलसीट दुचाकी चालवू नये, कार चालकांनाही निर्बंध लावले. सुरुवातीला पोलिसांनी याबाबत कडक कारवाई केली. नंतर याबाबत वाढता विरोध लक्षात घेता थोडीफार शिथिलता देण्यात आली. परंतु, परिस्थिती पूर्वपदावर येत असताना शासनाने दिलेल्या नियमांकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे.