महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात 'सोशल डिस्टन्सिंग'चा बट्ट्याबोळ... व्यापाऱ्यांची पास काढण्यासाठी गर्दी - कोरोना व्हायरस बातमी अकोला

अत्यावश्यक सेवा पुरवणारे दुकानदार, भाजी विक्रेते अशांनाही पोलीस मारत आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्यांना पासची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, हे पास काढण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागात गर्दी होत आहे. 'सोशल डिस्टन्सिंग'चे चे नियम धाब्यावर बसवून येथे मोठी गर्दी होत आहे.

people-deny-social-distance-in-akola
व्यापाऱ्यांची पास काढण्यासाठी गर्दी

By

Published : Mar 28, 2020, 12:15 PM IST

अकोला- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचार बंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासनकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी चोप द्यायला सुरुवात केली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा पुरवणारे दुकानदार, भाजी विक्रेते अशांनाही पोलीस मारत आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्यांना पासची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, हे पास काढण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागात गर्दी होत आहे. 'सोशल डिस्टन्सिंग'चे नियम धाब्यावर बसवून येथे मोठी गर्दी होत आहे.

व्यापाऱ्यांची पास काढण्यासाठी गर्दी

हेही वाचा-चिंताजनक..! केरळ, महाराष्ट्रासह तेलंगाणात कोरोनाचे 77 नवे रुग्ण

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज तिसरा दिवस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details