अकोला- येथील होलसेल फ्रुट मार्केटमध्ये आज पहाटे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. व्यापारी व ग्राहकांना पोलीस आणि मनपा बाजार कर्मचारी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा सल्ला देत असले तरी त्याकडे मात्र ग्राहक व व्यापाऱ्यांचे स्पष्ट दुर्लक्ष होत आहे.
अकोल्यातील फ्रुट मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; व्यापारी, ग्राहकांचा निष्काळजीपणा संचार बंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तू सुरू ठेवण्यात आलेल्या असताना या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा ठेवण्याचे आदेशही सरकारने दिलेले आहे. मात्र, सुरुवातीला व्यापाऱ्यांनी होकार देत आपला व्यवसाय सुरू केला.
अकोल्यातील फ्रुट मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; व्यापारी, ग्राहकांचा निष्काळजीपणा त्यानंतर त्यांनी सोशल डिस्टन्सिंगला केराच्या टोपलीमध्ये टाकले. विशेष म्हणजे, या ठिकाणी सहा पोलीस कर्मचारी व मनपा बाजार कर्मचारीही पहाटेपासून कार्यरत आहेत. पोलिसांनी अनेक व्यापाऱ्यांना खाक्या दाखविला असला तरीही या ठिकाणचा सोशल डिस्टन्सिंगचा फंडा हा नाममात्र राहिला आहे.
अकोल्यातील फ्रुट मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; व्यापारी, ग्राहकांचा निष्काळजीपणा विशेष म्हणजे, अकोल्यामध्ये 14 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले असून त्यापैकी एका रुग्णाने आत्महत्या केली. तर एक रुग्ण हा कोरोनामुळे दगावला आहे, असे असतानाही जिल्ह्यातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना या विषाणूचा कुठलाही भय राहिलेला नसल्याचे यावरून दिसून येत आहे.
अकोल्यातील फ्रुट मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; व्यापारी, ग्राहकांचा निष्काळजीपणा