अकोला- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण शहरातील बैदपुरा व दुसरा रुग्ण अकोट फाईल परिसरात आढळून आल्यानंतर महापालिकेच्या आशा वर्कर आरोग्य तपासणी करत आहेत. आरोग्य तपासणीसाठी जाणाऱ्या आशा वर्करला अकोट फाईल परिसरातील अकबर प्लॉट भागात काही महिला व नागरिकांनी धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी अकोट फाईल पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत मनपा उपयुक्त यांच्याकडे ही आशा वर्कर यांनी आपली कैफियत मांडली.
आरोग्य तपासणीसाठी केलेल्या आशा वर्करला शिवीगाळ; अकोट फाईल भागातील प्रकार
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण शहरातील बैदपुरा व दुसरा रुग्ण अकोट फाईल परिसरात आढळून आल्यानंतर महापालिकेच्या आशा वर्कर आरोग्य तपासणी करत आहेत.
या परिसरामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण ज्या परिसरात आढळून आले. त्याठिकाणी महापालिकेकडून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. तपासणी करण्यासाठी करवसुली लिपिक, शिक्षक व आशा वर्कर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. अकोट फाइल परिसरातील अकबर प्लॉट भागात आरोग्य तपासणीसाठी गेलेल्या मनपाच्या पथकातील आशा वर्कर यांना स्थानिक रहिवाशांनी घेराव घालून त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. या प्रकरणात पथक क्रमांक 34 मधील रवी वानखेडे, ज्योती गायकवाड, पथक क्रमांक 35 मधील विजयसिंग पवार, किरण साळुंखे, अभिजीत पोहे, टी. एम. देवरे यांनी अकोट फाईल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.