महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्वोपचार रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा लागत नाही शोध; मोठ्या भावाने दिला आत्मदहनाचा इशारा - अकोला रुग्णालयातील रुग्णांची परिस्थिती बातमी

सर्वोपचार रुग्णालयात 23 ऑगस्टला उपचारासाठी दाखल झालेला एक रुग्ण अचानक बेपत्ता झाला. त्याचा कुठेच शोध लागत नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने रुग्णाच्या मोठ्या भावाने 11 सप्टेंबरला आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

सर्वोपचार रुग्णालयातून रुग्ण बेपत्ता
सर्वोपचार रुग्णालयातून रुग्ण बेपत्ता

By

Published : Sep 1, 2020, 7:23 PM IST

अकोला :येथील देवराव हरी वाघमारे हा सर्वोपचार रुग्णालयात 23 ऑगस्टरोजी उपचारासाठी दाखल झाला होता. तो त्यांनतर रुग्णालयात मिळत नसून त्याचा शोध घेतला असता तो भेटत नाही आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाला विचारणा केली असता त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने रुग्णाच्या मोठ्या भावाने 11 सप्टेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. गजानन वाघमारे असे रुग्णाच्या भावाचे नाव असून त्यांनी रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाला आज(मंगळवार) निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. तर, रुग्ण बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा रक्षकांना शो कॉज दिली आहे.

सर्वोपचार रुग्णालयातून रुग्ण बेपत्ता

बुलढाणा येथील देवराव वाघमारे यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना 21 ऑगस्ट रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कोविड तपासणी आवश्यक असल्याने त्यांना रुग्णालयातील वार्ड क्रमांक 10 व 11 आणि नंतर नऊमध्ये हलविण्यात आले. परंतु, देवराव वाघमारे यांच्या नातेवाईकांना त्यांची प्रकृती कशी आहे, यासंदर्भात रुग्णालयाच्या प्रशासनाकडून कुठलीच माहिती दिला जात नसल्याची परिस्थिती आहे. परिणामी, त्यांचे मोठे भाऊ गजानन वाघमारे यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे त्रस्त झालेल्या गजानन वाघमारे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु, पोलिसांनीही त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही. तर, दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने तथा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णाचा तपास घेण्यासाठी संपूर्ण रुग्णालय परिसर शोधून काढला. तसेच स्वच्छतागृहही तपासून पाहिले. परंतु, तिथेही सदर रुग्ण त्यांना मिळाला नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली आहे.

भाऊ सापडत नसल्याने गजानन वाघमारे यांनी हताश होवून शेवटी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे 11 सप्टेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे. दहा सप्टेंबरपर्यंत माझ्या भावाच्या प्रकृती संदर्भात माहिती व त्याची भेट घेऊ न दिल्यास आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यासाठी त्यांना वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे व इतर पदाधिकाऱ्यांकडून समर्थन मिळत आहे.

हेही वाचा -'अहो जनाची नाही तर मनाची लाज बाळगा'

ABOUT THE AUTHOR

...view details