अकोला- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असे मोदी म्हणाले होते. त्यावेळी अनेकांनी त्यांचे बोलणे राजकीय असल्याचे म्हटले, निवडणुकीतील आश्वासनही म्हटले. परंतु, त्यांचे ते बोलणे राजकीय नसून एक धाडसी निर्णय होता. सरकार बनल्यानंतर सरकारसाठी त्यांनी ते लक्ष्य ठेवले आहे, असे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले.
बोलताना पुरुषोत्तम रुपाला ... हेही वाचा-निर्भया प्रकरण : 'तारीख पे तारीख...मात्र, प्रत्येक सुनावणी वेळी न्यायाची अपेक्षा कायम'
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, व युपीएलच्या वतीने आयोजित शासकीय अधिकारी, किटकनाशक उत्पादक व शेतकरी यांची आढावा बैठक व शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
माझ्या भाषणाची सुरुवात मला मोदीजींच्या 'माना के अंधेरा बहुत घना हैं, मगर दिप जलाना कहा मना हैं' या डायलॉग पासून करायची आहे. हा डायलॉग राजकीय नसून मोदी एक कविराजही आहेत, असे स्तुतीसूमने रुपाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काढले.