महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रोमाचंक सामन्यात पोलीस अधिकारी संघाचा विजय - अकोला जिल्हा लेटेस्ट न्यूज

पोलीस अधिकारी व पत्रकार संघामध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सामना पार पडला. या सामन्यात पोलीस अधिकारी संघाने पत्रकार संघासमोर 168 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र प्रत्युत्तरात पत्रकार संघाला 165 धावाच उभारता आल्याने, या आटीतटीच्या सामन्यात पोलीस अधिकारी संघाचा विजय झाला.

Organizing cricket matches Akola
पत्रकार संघ व पोलीस संघात क्रिकेट सामन्याचे आयोजन

By

Published : Jan 2, 2021, 10:12 PM IST

अकोला -सामाजिक एकता व बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी पोलीस रेझिंग डे व पत्रकार दिनानिमित्त पोलीस अधिकारी व पत्रकार संघामध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सामना पार पडला. या सामन्यात पोलीस अधिकारी संघाने पत्रकार संघासमोर 168 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र प्रत्युत्तरात पत्रकार संघाला 165 धावाच उभारता आल्याने, या आटीतटीच्या सामन्यात पोलीस अधिकारी संघाचा विजय झाला.

पत्रकार संघ व पोलीस संघात क्रिकेट सामन्याचे आयोजन

पोलीस अधिकारी संघाचा विजय

या सामन्याचे उद्घाटन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, मराठी पत्रकार संघाचे शौकतअली मिरसाहेब, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे यांच्याहस्ते करण्यात आले. या सामन्यात पोलीस संघाने प्रथम फलंदाजी करताना 12 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 168 धावांचे आव्हान उभारले. यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर 26, पीआय विलास पाटील 21, रवी सदांशिव नाबाद 53, तर सागर पांडे यांनी नाबाद 42 धावांचे योगदान दिले.पत्रकार संघाने धावांचा पाठलाग करताना 12 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात 165 धावाच केल्याने त्यांचा 4 धावांनी पराभव झाला. पोलीस अधिकारी संघाने पत्रकार संघावर विजय मिळवला. या सामन्याचे समालोचन प्रशांत जोशी आणि गोपाल मुकुंदे यानी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details