अकोला - कुटुंब नियोजन किटमध्ये एका आशा सेविकेला रबरी लिंग ( Rubber penis case inquiry Shingne reaction ) आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. ते अकोला येथील कुटासा येथे आयोजित कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्यावर भाजप आमदार श्वेता महाले यांनी केलेल्या आरोपाचेही खंडन केले.
हेही वाचा -अकोल्यात रस्त्यावर दिसला अति दुर्मिळ मांडूळ साप
बुलडाणा येथील कुटुंब नियोजन किटमध्ये रबरी लिंग आढळून आल्याप्रकरणी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बुलडाणा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.