अकोला - मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी गावात जमिनीच्या वादातून काल (5 जानेवारी) रात्री ३ वाजताच्या सुमारास दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय, अनेक जण किरकोळ जखमीदेखील झाले आहेत. दुर्योधन खांडेकर (वय ४८), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
जमिनीच्या वादातून एकाची हत्या तर चार जण गंभीर जखमी; मूर्तिजापूर तालुक्यातील घटना
मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवी गावाजवळील गायरान जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून दुर्योधन खांडेकर यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप होता. याला गावातील एका समुहाचा विरोध असल्याने त्यांनी काल रात्री ३च्या सुमारास दुर्योधन यांच्या घरावर हल्ला चढवला. या घटनेत दुर्योधन गंभीर जखमी झाले होते. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा -खळबळजनक! चक्क दारूसाठी काढले रुग्णाच्या शरीरातून रक्त; सायन रुग्णालयातील प्रकार
सांगवी गावाजवळील गायरान जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून दुर्योधन खांडेकर यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप होता. याला गावातील एका समुहाचा विरोध असल्याने त्यांनी काल रात्री ३च्या सुमारास दुर्योधन यांच्या घरावर हल्ला चढवला. या घटनेत दुर्योधन गंभीर जखमी झाले होते. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा गावातच मृत्यू झाला. तर, त्यांची 2 मुले, भाऊ आणि पुतण्या, असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.