अकोला - वादळी पावसादरम्यान वीज कोसळल्याने आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना २२ जून रोजी पातुर शहराजवळ घडली. अभिजीत श्रीकृष्ण इंगळे (१८) असे मृतकाचे तर मयूर रामकृष्ण इंगळे रा. वरखेड वाघजाळी ता. बार्शीटाकळी असे गंभीर जखमीचे नाव आहे.
वीज कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तर दुसरा जखमी - Varkhed
अकोला जिल्ह्यात आयटीआय प्रवेशासाठी आलेल्या अभिजीत इंगळे या विद्यार्थ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. पाऊस सुरू झाल्याने तो झाडाखाली उभा असताना हा प्रकार घडला.
बार्शी टाकळी तालुक्यातील वरखेड वाघजाळी येथील अभिजीत इंगळे व त्याचा चुलत भाऊ मयूर इंगळे हे पातुरातील आयटीआयमध्ये शनिवारी दुपारी प्रवेश घेण्यासाठी आले होते. प्रवेश प्रक्रीयेचे काम आटोपल्यानंतर ते गावी जाण्यास निघाले असता, वादळी पाऊस सुरू झाला. या पावसापासून वाचण्यासाठी त्यांनी रस्त्यावरील झाडाचा आधार घेतला. यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने अभिजीत इंगळे याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर मयूर इंगळे हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन जखमीस तातडीने सर्वोपचार रुग्णालयात पाठविले.