महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात आढळला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; बाधितांची संख्या तीनवर - अकोल्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

अकोल्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरलेल्या रुग्णाच्या 16 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीनवर गेली आहे.

अकोल्यात आढळला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
अकोल्यात आढळला आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By

Published : Apr 19, 2020, 2:44 PM IST

अकोला- जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच रविवारी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. अकोल्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरलेल्या रुग्णाच्या 16 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. 13 एप्रिलला अकोला शहरातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना आरोग्य विभागाकडून ताब्यात घेण्यात आले. त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. कुटुंबातील दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालात समोर आले आहे.

अकोल्यातील 12 पैकी 11 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. एक साडेतीन वर्षांच्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर एक रुग्णाचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आला होता. आरोग्य विभागाने त्याचा कुटुंबातील सदस्यांची तपासणी केली. त्यामध्ये त्याची 17 वर्षाची मुलगी व आज प्राप्त अहवालात मृताचा 16 वर्षाचा मुलगा हे दोघेही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अकोल्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीनवर गेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details