अकोला - शिवसेना वसाहतीतील शांतता नगरात राहणाऱ्या एका कुटुंबातील मोठ्या भावाने डोक्यात लोखंडी रॉड घालून लहान भावाचा खून केला आहे. बुधवारी रात्री संबंधित घटना घडल्यानंतर जुने शहर पोलिसांनी मारेकरी भावास अटक केली आहे. जय मोरे, असे मृत मुलाचे नाव असून अरुण मोरे याने त्याची हत्या केली आहे. आईच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शिवसेना वसाहतीत भावानेच केला भावाचा खून; पोलिसांनी घेतले ताब्यात - akola crime
शिवसेना वसाहतीतील शांतता नगरात राहणाऱ्या एका कुटुंबातील मोठ्या भावाने डोक्यात लोखंडी रॉड घालून लहान भावाचा खून केला आहे. बुधवारी रात्री संबंधित घटना घडल्यानंतर जुने शहर पोलिसांनी मारेकरी भावास अटक केली आहे.
शांतता नगरातील जय मोरे व अरुण मोरे हे दोघे भाऊ आईसोबत राहतात. अरुण मोरे यास पत्नी व एक मुलगी आहे. जयची आई ही शेजारी गेल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने अरुणने घरातील लोखंडी रॉड जयच्या डोक्यात मारला. यामुळे जयचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती जुने शहर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. यावेळी ठसे तज्ज्ञ पथक ही दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी अरुण मोरे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तसेच आईच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. यामध्ये पोलिसांनी अरुण मोरे यास अटक केली असून पुढील कारवाई जुने शहर पोलीस करत आहेत.