महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला : कार-दुचाकी अपघातात भावाचा मृत्यू; बहीण व भाचा गंभीर

मलकापूर-येवता रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. यात एकजण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहने

By

Published : Oct 8, 2019, 8:23 PM IST

अकोला- मलकापूर-येवता रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली. या अपघातात दुचाकी कारच्या खाली दबून कार व दुचाकी हे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडले. या अपघातात ज्ञानेश्वर लांडे यांचा मृत्यू झाला. त्यांची बहीण सरला कापसे व भाचा अर्जुन विलास कापसे हे गंभीर जखमी झाले. हे अकोल्यात कपडे घेण्यासाठी जात होते.

हेही वाचा - अकोल्यात मोकाट कुत्र्यांची दहशत; 27 जणांना घेतला चावा


येवताकडे जाणारी कार (क्र. एम एच 30 ए झेड 3042) ने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवर बसलेले ज्ञानेश्वर लांडे हे गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्यासोबत असलेली त्यांची बहीण सरला कापसे व भाचा अर्जुन कापसे हेही गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवर असलेले बहीण-भाऊ हे अकोला येथे दसऱ्यानिमित्त कपडे घेण्यासाठी सुक्रिया गावावरून निघाले होते. परंतु, वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अपघात एवढा भीषण होता की रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कार आणि दुचाकी जाऊन फसली. त्यावरून या अपघाताची गंभीरता दिसून येते. घटनास्थळी खदान पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले होते. तसेच जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ज्ञानेश्वर लांडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान धडक देणारी ही कार केसवानी नामक व्यक्तीची असल्याचे घटनास्थळावर असलेल्या पोलिसांनी सांगितले. या अपघाताबाबत खदान पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

हेही वाचा - वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीने रास्तारोको करीत पुतळा दहन

ABOUT THE AUTHOR

...view details