अकोला - अकोट फैलमधील भोईपुरा येथे राहणाऱ्या दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यावेळी एकास मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी अकोट फैल पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. प्रवीण विजय कांबळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
अकोट फैलमध्ये किरकोळ कारणावरून वाद; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू - अकोला वादतून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
भोईपुरा येथील प्रविण विजय कांबळे व शेजारी गणेश विश्वानाथ कांबळे यांच्यात 7 जूनला दुपारी किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने त्यांच्यात मारहाण झाली. त्यामध्ये प्रवीण कांबळे यांना जबर मारहाण करण्यात आली. यावेळी ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला.
या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की भोईपुरा येथील प्रविण विजय कांबळे व शेजारी गणेश विश्वानाथ कांबळे यांच्यात 7 जूनला दुपारी किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने त्यांच्यात मारहाण झाली. त्यामध्ये प्रवीण कांबळे यांना जबर मारहाण करण्यात आली. यावेळी ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. मृताची पत्नी सारिका प्रविण कांबळे यांच्या तक्रारीवरुन अकोट फैल पोलीस ठाण्यात गणेश विश्वनाथ कांबळे, अविनाश उर्फ गोलू गणेश कांबळे, अनिकेत गणेश कांबळे या बापलेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.