महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवीगाळ करणे पडले महागात, मारहाणीत एकाचा मृत्यू - latest crime news

बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांजरी गावातील नागोराव मुंडे यांनी महादेव गोकुळ पवार व रुपेश सदानंद गाडगे या दोघांना शिवीगाळ केली. शिवीगाळ करण्यामागील नेमके कारण कळू शकले नाही. त्यानंतर या दोघांनी नागोराव यांना मारहाण केली. या मारहाणीत नागोराव यांचा मृत्यू झाला.

one died during dispute in akola
नागोराव मुंडे - मारहाणीत मृत्यू

By

Published : May 26, 2020, 1:26 PM IST

अकोला- शिवीगाळ करणे मांजरी गावातील एका 56 वर्षीय व्यक्तीस चांगलेच महागात पडले आहे. शिवीगाळ केल्याच्या रागातून या व्यक्तीला दोघांनी मारहाण केली असून या मारहाणीत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. नागोराव राजाराम मुंडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रकरणी दोघांना उरळ पोलिसांनी अटक केली आहे.

बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांजरी गावातील नागोराव मुंडे यांनी महादेव गोकुळ पवार व रुपेश सदानंद गाडगे या दोघांना शिवीगाळ केली. शिवीगाळ करण्यामागील नेमके कारण कळू शकले नाही. त्यानंतर या दोघांनी नागोराव यांना मारहाण केली. या मारहाणीत नागोराव यांचा मृत्यू झाला.

मृताच्या पत्नीने उरळ पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला. महादेव पवार व रुपेश गाडगे हे दोघेही जवळच असलेल्या खंडाळा गावाजवळील जंगलात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, बीट जमदार संजय कुमार, विजय चौहान, शैलेश घुगे यांनी त्यांचा पाठलाग केला आणि दोघांनाही ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पाटील करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details