अकोला- कोरोना रुग्णांचा आजचा तपासणी अहवाल सायंकाळी प्राप्त झाला आहे. या अहवालात 12 जण पॉझिटिव्ह सापडले असून सकाळी 78 असे मिळून 90 जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. एकाचा मृत्यू झाला असून 28 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
अकोल्यात नवीन 90 रुग्ण पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू, 28 जणांची कोरोनावर मात - akola corona positive patient death news
पॉझिटिव्ह आलेल्या 12 अहवालात सहा महिला व सहा पुरुष आहेत. त्यात सात जण तारफैल येथील तर चार जण लहा उमरी व खदान येथील एक जण रहिवासी आहेत. आज दुपारनंतर एका जणाचा मृत्यू झाला असून त्यात बार्शी टाकळी येथील 53 वर्षीय पुरुष आहे. हा रुग्ण 16 जूनला दाखल झाला होता त्याचा आज दुपारनंतर मृत्यू झाला.
सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या 12 अहवालात सहा महिला व सहा पुरुष आहेत. त्यात सात जण तारफैल येथील तर चार जण लहा उमरी व खदान येथील एक जण रहिवासी आहेत. आज दुपारनंतर एका जणाचा मृत्यू झाला असून त्यात बार्शी टाकळी येथील 53 वर्षीय पुरुष आहे. हा रुग्ण 16 जूनला दाखल झाला होता त्याचा आज दुपारनंतर मृत्यू झाला.
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच जणांना घरी सोडण्यात आले. ते रुग्ण सिंधी कॅम्प, खैर मोहम्मद प्लॉट, महाकाली नगर, अकोट फैल व शंकरनगर येथील रहिवासी आहेत. तर कोविड केअर सेंटर मधून 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सिंधी कॅंप मधील सहा जण, खदान, अशोक नगर व अकोट फैल येथील प्रत्येकी तीन जण व देशमुख फैल, शिवनी, शिवाजीनगर, लहुजी नगर, लाडिस फैल, हरिहर पेठ, शंकर नगर व बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
*प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-३४५
*पॉझिटीव्ह अहवाल-९०
*निगेटीव्ह-२५५
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १५१०
*मयत-७७ (७७+१)
*डिस्चार्ज-१०७५
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३५८