अकोला-जिल्ह्यातकोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी 11 आणि सायंकाळी 32 रुग्ण असे एकूण 43 रुग्णांना अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. तर एका 74 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
चिंता वाढली ! अकोल्यात मंगळवारी 43 जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह, एकाचा मृत्यू - corona virus news
मंगळवारी उपचारादरम्यान एका 74 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हा व्यक्ती गुलशन कॉलनी येथील रहिवासी असून तो 26 मे रोजी रुग्णालयात दाखल झाला होता.

प्राप्त 32 पॉझिटिव्ह अहवालात 14 महिला आणि 18 पुरुषांचा समावेश आहे. त्यात 5 जण हैदरपुरा, 4 जण न्यू तापडिया नगर, 4 जण खदान नाका, 2 जण खडकी येथील तर 2 जण आदर्श कॉलनीतील रहिवासी आहेत. तर उर्वरीत सिव्हिल लाईन, शिवाजी नगर, तार फैल, खेडकर नगर, नायगाव, पोलीस क्वार्टर रामदास पेठ, खैर मोहम्मद प्लॉट, बाळापूर, वाशीम बायपास, कैलास टेकडी, सोलसो प्लॉट, अशोकनगर, फिरदौस कॉलनी, हांडे प्लॉट, सोनटक्के प्लॉट येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
दरम्यान, मंगळवारी उपचारादरम्यान एका 74 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हा व्यक्ती गुलशन कॉलनी येथील रहिवासी असून तो 26 मे रोजी रुग्णालयात दाखल झाला होता.
जिल्ह्यात सध्याची कोरोना स्थिती-
-एकूण पॉझिटिव्ह अहवाल-८६४
-मृत- ४०(३९+१)
-डिस्चार्ज-५४५
-ॲक्टिव्ह केसेस- २७९