अकोला - टिळक रोडवरील अलंकार मार्केटच्या तीन मजली इमारतीवरून एकाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. मात्र, नातेवाईकांनी त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याची चर्चा आहे. मोहम्मद जहांगीर मोहम्मद जावेद असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन एकाची आत्महत्या - अकोला पोलीस बातमी
अकोल्यात टिळक रोडवरील अलंकार मार्केटच्या इमारतीवरून उडी घेऊन एकाने आत्महत्या केली. या अत्महत्ये मागे घातपात झाल्याचा सशंय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
टिळक रोडवरील अलंकार मार्केटच्या तीन मजली इमारती वरून मोहम्मद जहागीर मोहम्मद जावेद यांनी अचानकपणे उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांना इमारतीवरून खाली पडताना अनेकांनी पाहीले आल्याची माहिती मिळत आहे. रामदास पेठ पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेत मोहम्मद जहांगीर यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, रुग्णालयात नातेवाईकांनी त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला असल्याची चर्चा आहे. घटनास्थळावरील पोलिसांकडून पंचनामा व इतर कारवाई करण्यात येत आहे.